Home क्राईम विवाहितेचा विनयभंग करून आईवर बलात्कार करण्याची दिली धमकी!

विवाहितेचा विनयभंग करून आईवर बलात्कार करण्याची दिली धमकी!


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका भागात एका २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून, तिला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ एप्रिल रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिला आपल्या राहत्या घरात असताना, तिचे पती जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गावामध्ये गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून संशयित आरोपी काशिनाथ निर्मलदेव राठोड (रा. नशिराबाद) याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. संशयित आरोपीने पीडित विवाहितेचा हात धरून तिच्याशी अश्लील चाळे केले व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पीडितेने या कृत्याचा प्रतिकार केला असता, आरोपीने तिला या प्रकरणाबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्या आईवर बलात्कार करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी काशिनाथ राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी व त्यांचे पथक करत आहेत.


Protected Content

Play sound