जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी येणार असून शेगावात याची दिवशी सायंकाळी राहुल गांधी यांची जंगी सभेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा सुरू असून ही यात्रा महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जाणार आहे. ही यात्रा बुलढाणा जिह्यातील शेगाव येथे शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. या यात्रेत २०० बसमधून जिल्ह्यातील जवळपास १० हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आ. शिरीष चौधरी यांनी कार्यकर्त्यांनी बसचे तिकीट काढून शेगाव येथील सभेल हजर राहावे असे आवाहन केले. तसेच यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँक चेअरमन गुलाबराव देवकर यांनी देखील यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी याप्रसंगी कॉंग्रेस जि. प. गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, शहर अध्यक्ष श्याम तायडे, सचिव श्री. कोळपकर, ओ. बी. सी. सेल अध्यक्ष डी. डी. पाटील, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी जमील शेख, शिसेनेचे हर्षल माने, महानगराध्यक्ष शरद तायडे, गजानन मालपुरे, निलेश चौधरी तसेच राष्ट्रवादीतर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,शेखर सोनाळकर, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे आदी उपस्थित होते.