आमदार संपर्कात आहेत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी – एकनाथ शिंदे याचं खुलं आव्हान

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “आमदार आमच्या संपर्कात आहेत असं म्हणणाऱ्यांनी त्यांची नावं सांगावी.” असं खुलं आव्हान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. गुवाहटीमधील हॉटेलच्या बाहेर येत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि लवकरच आपण मुंबईला जाणार असल्याचं सांगितलं.

आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांनी पहिल्यांदाच गुवाहटीमधील हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे समर्थक गटाचे दावे फेटाळले. आणि काही आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणणाऱ्यांनी नावं सांगावी, असं आव्हान एकनाथ शिंदे केलं.

ते म्हणाले की, “. गुवाहटीमधील सर्व आमदार अगदी आनंदात असून बाहेरून काही लोक गुवाहटीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. मात्र कोणते आमदार त्यांच्या संपर्कात आहेत त्यांची नावं त्यांनी सांगावी. त्यानंतरच यावर स्पष्टता होईल. दीपक केसरकर आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते असून ते माध्यमांना वेळोवेळी माहिती देतील आहेत. असे शिंदें यांनी सांगितले.

 

Protected Content