थोरगव्हाण येथील जि. प. प्रा. शाळेला लोकसहभागातुन संगणक भेट

 

यावल प्रतिनिधी | थोरगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लोकसहभागातुन संगणक भेट देण्यात आले.

तालुक्यातील थोरगव्हाण लोकसहभागाने जिल्हा परिषदच्या शाळेचा झालेला संगणकी कायापलट पाहुन “गाव करील ते राव काय करील” या म्हणीचा अर्थ थोरगव्हाणच्या गावकर्‍यांनी प्रत्यक्षात उतवरला आहे. थोरगव्हाण येथील गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून डीजीटल करण्याचा निर्णय घेऊन शाळेला संगणक व एल.ई.डी.टि.व्हि.भेट देवुन शैक्षणीक क्षेत्रात एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतले आहे.

यावल तालुक्यातील थोरगव्हाण हे अवघ्या दोन हजार लोकसख्येच गाव आणि गावात जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची ४ थी पर्यन्त शाळा आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १३१ असून विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता देखील अतिशय चांगली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप साठी भरपूर विद्यार्थी येथून पात्र झालेले आहेत.

मागील दोन वर्षापासुन कोवीड १९ च्या काळात ही शाळा बंद असून ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आभ्यास देत शिक्षण पुर्ण केले व शासनाच्या १६ कलमी कार्यक्रमाची रुपरेषा पालकांच्या लक्षात आणुन लोकसहभागातुन शाळेच्या समस्या माडुन सोडविण्यासाठी पालकांना आग्रह करुन शाळेच्या कायापालट करण्यास सुरुवात करण्यात आल्याने शाळेच्या कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे.

शाळा व्यवस्थापन समीतीचे आजी, माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच पदाधिकारी, आणि गावातील दानशुर व्यक्तीच्या घरी समिती सदस्य घरोघरी जाऊन लोकांना याची माहिती दिली आणि लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली.शंभर रुपयांपासून ११००० पर्यन्त ४३३६० रुपये ग्रामस्थांनी देणगी दिली.

जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांच्या आदेशाप्रमाणे माजी विद्यार्थी यांचे कडून १६ कलमी कार्यक्रम अंतर्गत शाळेत संगणक, वॉश बेसिन, परस बाग, बाला पैंटिंग सदर कामे माजी विद्यार्थी व ग्रामपंचायत वित्त आयोग निधी मार्फत करून शालेय विकास करण्याचा आवाहनला प्रतिसाद देत शालेय कामे पूर्ण करणे याकामी लोकसहभागातुन निधी जमा करून माझी शाळा मी जबाबदार या अनुषंगाने जबाबदारी घेऊन मदत करीत दोन संगणक भेट दिले असल्याची माहिती मुख्यध्यापक महेद्र देवरे यांनी दिली. थोरगव्हाण गावातील ग्रामस्थांनी दिलेले शिक्षणासाठीचे योगदान हे एक आर्दश निर्माण करणारे आहे .

Protected Content