बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात यंदा ही अनुभवता येईल निसर्गानुभव

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या 23 मे रोजी बुध्द पौर्णिमेच्या येऊ घातली असून त्यानिमित्ताने होणाऱ्या प्राणी प्रगणनेच्या तयारीला प्रादेशिक वनविभागाने गती दिली आहे. तसे पाहता वन्यप्राणी प्रगणनेच्या विविध पध्दती असून त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे देखील गणना होते. मात्र नवखे निसर्गप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांना संपूर्ण रात्र जंगलात काढून त्याचा थरारक अनुभवता लुटता यावा, त्यासोबतच दर्शन देणाऱ्या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणून रावेर वनक्षेत्र प्रादेशिक वनविभागाच्या वतीने निर्सग अनुभवाचे आयोजन केले जाते. जिल्हयातील रावेर वनक्षेत्रात निसर्ग अनुभव उपक्रमासाठी तयारीला वेग आला आहे. वनक्षेत्रात पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुध्द पाणी पुरवठा करणे, पाणवठयाशेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरु आहेत.

रावेर शहरापासुन अवघ्या 12 किलोमिटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या रावेर वनक्षेत्र प्रादेशीक मध्ये एकुण 11 मचाण यंदा निसर्ग अनुभवासाठी उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंजन, मोर, चिकारा असे मचान तयार करण्यात आले आहेत. यापैकी 07 मचाणांची ऑनलाईन बुकींग निसर्गप्रेमींना करता येणार असून 4 पाणवठे राखीव ठेवण्यात येणार आहेत. रावेर वनक्षेत्रात निसर्गप्रेमींना मुख्यत्वे वाघ,बिबट, अस्वल, तडस, कोल्हा यासह चितळ, भेडकी, सायाळ, निलगाय, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीवांचे दर्शन घडते. तसेच विविध प्रकारचे पक्षी सरीसृप यांचाही आढळतात. सातपुडा जंगल सफारीच्या दरम्यान जवळच वनक्षेत्रात उत्तम निसर्गानुभव देते.

यावेळी रावेर वनपरिक्षेत्राचे अधिकारी अजय बावणे यांनी सांगितले की, रावेर वनक्षेत्रात पाणवठ्यांची साफसफाई, मचाण निर्मिती इतर सर्वच कामांना वेग देण्यात आला आहे. निसर्गप्रेमींना पर्यावरणपुरक जंगल सफारी मार्गाचा सुध्दा चांगला अनुभव घेता यावा, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत. साधारपणे बुध्द पौर्णिमेच दिवशी सकाळी 10 वाजता पाल पार्क निसर्ग परिचय केंद्र येथे एकत्रिकरण होईल त्यानंतर नोंदणी, दुपारचे भोजन करुन दुपारी दोनच्या सुमारास सर्वजण आपापल्या मचाणांकडे मार्गस्थ होतील. याकरीता यावल वन विभाग, जळगांव येथे ऑनलाईन बुकींग करणे आवश्यक असुन लवकरच नोंदणीला वेबसाईटवरुन प्रारंभ होईल.

Protected Content