Home Cities जळगाव स्वावलंबी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाची ‘ही’ महत्वाची योजना

स्वावलंबी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाची ‘ही’ महत्वाची योजना


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी प्रशासनाने एक महत्वाची योजना सुरु केली आहे. हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला मान्यता मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना रोजगारनिर्मितीच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्राप्त होईल आणि त्यांचा जीवनमान उंचावता येईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित पोर्टल – https://register.mshfdc.co.in – २२ जानेवारी २०२५ रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ०६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ कार्यालय यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेऊन स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी योग्य भविष्य घडवण्यासाठी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound