तृतीय पंथीयांनी शासनाच्या योजनाचा फायदा घेवून समाजाच्या मुख्यप्रवाहात यावे – शमिभा पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण जळगाव कार्यालयाच्या तृतीयपंथीयासाठी आयोजित एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरात शमिभा पाटील बोलत होत्या. शासन व प्रशासन तृतीयपंथीयांसाठी उत्तम काम करत आहे. त्याप्रमाणे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीनी देखील यामध्ये सहभाग नोंदवून व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे शमिभा पाटील यांनी आवाहन केले.

या प्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन डॉ. व्ही.ए. तडवी यांनी विभागाच्या योजनां संदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव येथील प्रियंका पाटील यांनी नवउद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व त्याच्या लाभाच्या प्रक्रिये बाबत माहिती दिली. सेन्ट्रल ग्रामीण स्वयंरोजगार संस्था येथील स्वप्नील मराठे, यांनी त्यांचे संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या विनामुल्य निवासी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सी.एस.सी. सेंटर चे जिल्हा समन्वयक अभिनंदन पाटील यांनी सी. एस. सी. सेंटर नोंदणी करणे बाबत सविस्तर विवेचन केले.

तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व तक्रार निवारण जिल्हास्तरीय समिती सदस्या अंजली पाटील, नैना पाटील यांच्यासह जिल्हाभरातून तृतीयपंथी व्यक्ती उपस्थित होते.
जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, सेन्ट्रल ग्रामीण स्वंयरोजगार संस्था व महा-ई सेवा केंद्रांच्या विविध योजनांच्या तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने आज 8 फेब्रुवारी,2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जळगांव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या सहायक आयुक्त समाजकल्याण, योगेश पाटील यांनी जिल्हास्तरीय तृतीयपंची कल्याण मंडळ यांचे हाभरातील तृतीयपंथीयांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणेकरिता करण्यात येत उपाययोजनांची माहिती दिली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यालय अधिक्षक राजेन्द्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक, समीर क्षत्रिय, अरुण तालुका समन्वयक महेन्द्र पाटील, चेतन चौधरी, आदींनी प्रयत्न केले. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content