Home Cities अमळनेर महिलेला अमळनेर बसस्थानकात फटका; सोन्याची मंगलपोत चोरट्यांनी लांबविली

महिलेला अमळनेर बसस्थानकात फटका; सोन्याची मंगलपोत चोरट्यांनी लांबविली

0
102


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, हर्षदा हेमंत भदाणे वय २२ रा. शिंदखेडा ता. धुळे या महिला कामाच्या निमित्ताने चोपडा येथे जाण्यासाठी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी बसने अमळनेर शहरात आलेल्या होत्या. दुपारी १ वाजता चोपडा येथे जाण्यासाठी बसची वाट बघत उभ्या होत्या. त्यानंतर चोपडा बस आल्यानंतर गर्दीत चढून बसमध्ये सीटवर बसल्या. त्यावेळी गर्दीच्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २४ हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपेात चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र मंगलपोतचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सायंकाळी ६.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound