किनगाव येथून एकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील सरकारी दवाखान्याजवळून तरूणाची दुचाकी लांबविली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश सुरेश बाविस्कर (वय-३०) रा. पुनगाव ता. चोपडा हा तरूण मोल मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. उमेश हा मजूरी करत असल्याने मिळेल त्या गावी जावून काम करतो. यासाठी त्याच्याकडे  (एमएच १९ डीडी ३४१७) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीचा वापर तो कामासाठी करत असतो. २४ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास उमेश बाविस्कर हा दुचाकीने यावल तालुक्यातील किनगाव येथे आला. गावातील  सरकारी दवाखान्याजवळ त्याने दुचाकी पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आली. उमेश आपल्या दुचाकीचा शोध संपुर्ण परिसरात घेतला परंतू कुठेही दुचाकी मिळाली नाही. अखरे सोमवारी ३० मे रोजी सकाळी ११ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.

Protected Content