Home क्राईम स्कुटी व मोबाईल चोरीचा छडा ; एलसीबीकडून तिघांना अटक

स्कुटी व मोबाईल चोरीचा छडा ; एलसीबीकडून तिघांना अटक

0
125


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव परिसरातून स्कुटी आणि महागडा मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची स्कुटी, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगावात राहणारे गणेश तानाजी गवळी यांची स्कुटी आणि मोबाईल १२ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास चोरीला गेला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.

तपास पथकाची कारवाई :
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस उप-निरीक्षक शेखर डोमाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान सायगव्हाण ता. कन्नड येथील संशयितांची माहिती मिळाली. पथकाने तातडीने कारवाई करत मनोज छोटू मोरे (वय १९), आदित्य बाजीराव वाघ (वय २१) आणि विनोद रामदास सौदाणे (वय १९) या तिघांना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी मनोज मोरे याला श्रीरामपूर जि. अहिल्यानगर येथून शिताफीने पकडण्यात आले. पोलीसांनी स्कूटी, मोबाईल आणि दुचाकी जप्त केले आहे


Protected Content

Play sound