जळगाव प्रतिनिधी । कंपनीतून घरी निघालेला तरूण हा मोबाईवर बोलत असतांना मागुन भरधाव वेगाने दुचाकीवरून येवून दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज नाना पाटील (वय-१८) रा. राम मंदीरजवळ, अयोध्यानगर हा एमआयडीसीतील जगवाणी कंपनीत कामाला जातो. त्याच्याकडे काका धर्मराज मांगो पाटील यांचा १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल तात्पुरता वापरण्यासाठी घेतला.
११ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना गुरांच्या मार्केटजवळ मागून दुचाकीवर २० ते २२ वयोगटातील अज्ञात दोन जणांनी मोबाईलवर बोलत असतांना हातातील मोबाईल बळजबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली.
सुरज पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी आणि सचिन पाटील करीत आहे.