जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील बिसमिल्ला चौकात रिक्षाचालकाची त्याच्या घराच्या कुंपनातून पाण्याची मोटार चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी रविवार, ९ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बिसमिल्ला चौकात बबलू शेख उस्मान (वय ३२) हे रिक्षाचालक राहतात. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बबलू शेख यांच्या घरातील कुंपनातून त्यांची ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही पाण्याची मोटार मिळून न आल्याने चोरीची खात्री झाल्यावर सहा दिवसानंतर बबलू शेख यांनी रविवार, ९ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.