रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोड्यांच्या प्रकरणातील तिसरा गुन्हा रात्री उशिरा दाखल झाल आहे. यात २५ ग्रॅम सोन्याचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे दागीने लंपास झाल्याची तक्रार आहे. यामुळे वेगवेगळ्या चोर्यांच्या घटनांमध्ये एकूण ४६ ग्रम सोन्याच्या दागीन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
रावेर शहरात चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. यात दि २५ च्या रात्री रावेर शहरात झालेल्या घरफोड्या मध्ये चार घटनांचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहत. तर काही ठिकाणी चोरीच प्रर्यत्न झाले आहे.यामुळे काल दिवसभर रावेर शहरात चोरीची एकच चर्चा होती.रात्री उशिरा जीआय कॉलनी येथील वंदना विलास अटकाळे यांचे देखील कडीकोंडा अज्ञात चोरट्याने तोडून २५ ग्रॅम सोन्याचे दागीने लंपास केले आहे.
या बाबत रात्री उशिरा रावेर पोलिस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.