मुक्ताईनगर तहसील कार्यालयात ग्राहक दिन निमित्त कार्यक्रम

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तहसील कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तहसील कार्यालयात २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून, ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम साजरा केला असता, सुरुवातीला जागो ग्राहक जागो या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पूजन ग्राहक फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष धनंजय सापधरे, पोलीस पाटील मोहन मेढे या मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. पुरवठा निरीक्षक ऋषिकेश गावडे यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

प्रसंगी माजी पोलीस पाटील मोहन मेढे यांनी मनोगतात म्हटले की, प्रत्येक माणूस हा जन्मापासून तर मरणापर्यंत ग्राहकच आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू खरेदी करतो परंतु पक्के सही शिक्क्याचे बिल दुकानदाराकडून घेत नाही. म्हणूनच ग्राहकांची फसवणूक होते. प्रत्येक ग्राहकाने पक्के बिल हे घ्यावे जळगाव जिल्ह्यावर ग्राहक मंच आहे. त्यात आपणाला न्याय मिळवता येतो तसेच पुरवठा निरीक्षक ऋषिकेश गावडे, ग्राहक फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष धनंजय सापधरे, तुकाराम पाटील, बोंडे गुरुजी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून ग्राहकांचे हक्क व अधिकार सांगून जुना व नवीन सुधारित कायदा बद्दल मार्गदर्शन केले. सदरचे कार्यक्रमाला पुरवठा अव्वल कारकून प्रदीप आडे, सपना सापधरे, विकास मेहरे, मनोज निकम, लक्ष्मण चौके, महेंद्र उमाळे व आदी उपस्थित होते.

Protected Content