Home क्राईम भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून सोन्या-चांदीसह रोकड लांबविले

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून सोन्या-चांदीसह रोकड लांबविले


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील फातेमा कॉलनी परिसरात एक धक्कादायक घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसिम अहमद अब्दुल बासिद शेख (वय ४३, रा. फातेमा कॉलनी, भुसावळ) हे जैन इरिगेशन, जळगाव येथे नोकरीला आहेत. त्यांचे घर २८ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ३० मार्च रोजी सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

लाखोंचा मुद्देमाल चोरीला:
चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि २ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. घरफोडीचा हा प्रकार वसिम शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound