Home क्राईम आशाबाबा नगरात चोरट्यांचा धुमाकूळ ; बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लांबविला

आशाबाबा नगरात चोरट्यांचा धुमाकूळ ; बंद घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लांबविला

0
140


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आशाबाबानगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एका हॉटेल मॅनेजरच्या घरात शिरून सोन्याचे दागिने आणि घराबाहेर उभी केलेली दुचाकी, असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळ दिनकर चौधरी वय ५१ रा. आशाबाबा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हॉटेल मॅनेजर म्हणून ते नोकरीला आहे. ३ मार्च रोजी रात्री १२:३० ते पहाटे २ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात आरोपीने चौधरी यांच्या घरात कोणाचीही संमती न घेता प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूंसह बाहेर उभी असलेली दुचाकी चोरून नेली.

यावेळी चोरट्यांनपी ३५ हजाराचे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि (एमएच १९ बीवाय ११४५) क्रमांकाची दुचाकी असा एकुण ४५ हजारांचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound