अमळनेर-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सेंट्रल बँकसमोरून किरणा दुकानदारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भगवान हिरालाल चौधरी वय ४७ रा. सराफ बाजार, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भगवान चौधरी हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच १९ बीके ८७०९ ने शहरातील सेंट्रल बँकेजवळ आलेले होते. तेथेच त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दरम्यान दुचाकीची चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.