


जळगाव प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून २ लाख रूपये काढून पायी जात असलेल्या वृध्दांच्या हातातून पैश्यांची पिशवी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटा राहूल उत्तम चौधरी (वय-२६) रा. मांडकी ता. भडगाव याची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
शनिपेठेतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक धनराज प्रेमराज पुरोहित (वय-६०) यांच्या हातातून २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता राहुल चौधरी याने दोन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत नागरीकांनी राहूल चौधरी याला पाठलाग करुन पकडत बेदम चोप दिला होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित राहूल चौधरी यास न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयित राहूल याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक बिरारी करीत आहे.


