चोरीच्या पाच दुचाकींसह चोरट्याला अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैय्याज शकुर मनीयार रा.दोडाइचा जि. धुळे सुप्रीम कॉलनी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात फैय्याज शकुर मनीयार हा तरुण चोरीच्या दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार पथकाने गुरुवार १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता सुप्रीम कॉलनी कारवाई करत संशयित आरोपी फैय्याज शकुर मनीयार याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केली आहे.

पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, स.फौ. अतुल वंजारी, पोहेका दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदीवे, सचीन पाटील, पोका नाना तायडे, ललीत नारखेडे, किरण पाटील, महीला अंमलदार राजश्री बावीस्कर यांनी केली आहे.

Protected Content