चोरीच्या १९ दुचाकींसह चोरट्याला अटक; पारोळा पोलीसांची कामगिरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील तरवाडे येथील व हल्ली मु. सातपूर, नाशिक येथील एका आरोपीकडून चोरीच्या १९ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यास अटक करण्यात आले आहे. पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे. किशोर संजय चौधरी (रा. तरवाडे ता. पारोळा ह.मु. सातपुर कॉलनी, नाशिक असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली होती. किशोर संजय चौधरी हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा तालुक्यातील आडगाव, तरवाडे, शिवरे व परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हददीत येणार आहे, ही माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठठल जाधव, पोहेका प्रविण पाटील, पोना संदिप सातपुते, पोकों अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यावरुन नमुद पथक हे साधारण ३ दिवसा पासुन पारोळा शहर व हद्दीत किशोर संजय चौधरी याचा कसोशीने शोध घेत होते. दि. १२ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर संजय चौधरी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता संशयित आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हद्दीतून व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याचे कबुली दिली. त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत.

Protected Content