कासमवाडीतून मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कासमवाडी आठवडे बाजारातून तरूणाचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरट्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

जळगाव शहरातील कासमवाडी भागात दर शनिवारी आठवडे बाजार भरतो, बाजार असल्याने  चंद्रशेख अर्जून शिंपी (वय-३४) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हा तरूण १८ फेब्रुवारी २०२० रोजी बाजारासाठी आला होता. बाजार करतांना अज्ञात चोरट्याने खिश्यातील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलीसांचा तपास सुरू होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित चोरटा हा मध्यप्रदेशात असल्याचे समजले. त्यानुसार पोहेकॉ गफुर तडवी, पो.कॉ. चेतन सोनवणे, किरण जोशी अशांच्या पथकाला मध्यप्रदेशात रवाना करून संशयित आरोपी मुरारीला शंकरलाल बिल्लोरे (वय-३९) रा. सिवनी अमलाडा कला होशंगाबाद मध्यप्रदेश याला अटक केली. त्याच्या ताब्यातील चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात हजर केले असा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. संशयित आरोपीकडून अजून मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

 

Protected Content