पारोळा, प्रतिनिधी | विद्यार्थ्यांनी परीक्षा काॅपीमुक्त दिल्याशिवाय बुध्दीचा व व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही असे प्रतिपादन उपनिरीक्षक बागुल यांनी केले. ते छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगांव) या शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी पारोळा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुदर्शन दातीर , मुंबईतील स.पो.नि. प्रशांत पाटील , पोस्टल असिस्टंट संदीप पाटील, रेल्वे अधिक्षक योगेश पाटील व राजवडचे सुपुत्र ज्ञानेश्वर पाटील, जि.प.शाळेचे शिक्षक मनवंतराव साळुंखे व गुणवंतराव पाटील व निळकंठ पाटील आदी उपस्थित होते.
कोणतेही काम करतांना सातत्यपणा व चिकीत्सकपणा आपल्या अंगी जोपासावा असा सल्ला संदिप पाटील यांनी दिला. या कार्यक्रमासाठी स.पो.नि. प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष तथा मा.आ. साहेबराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा व अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, सचिव लोटन देसले तसेच राजवड, खेडीढोक व दगडीसबगव्हाण ग्रामस्थ यांनी विशेष कौतुक केले. यशस्वितेसाठी मुख्याध्यापक योगेश सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक बंधु व भगिनींनी प्रयत्न केलेत. सुत्रसंचालन स्वप्निल पवार यांनी तर आभार बबिता पटेल यांनी मानले.