नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला ‘महाराष्ट्र केसरी’

maharashtra kesari sadgir

पुणे, वृत्तसंस्था | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत’ नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली आहे. हर्षवर्धनने आपलाच सहकारी शैलेश शेळकेवर मात करत मानाची गदा पटकावली आहे.

 

हर्षवर्धनने अंतिम फेरीत अखेरच्या सेकंदामध्ये बाजी मारत शैलेश शेळकेवर ३-२ ने मात केली. पुण्याच्या म्हाळूंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या अंतिम फेरीसाठी अनेक कुस्ती शौकिनांनी गर्दी केली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल काका पवार यांच्या तालमीतले आहेत. त्यामुळे हा विजय माजी अर्जुन पुरस्कार विजेते प्रशिक्षक काका पवार यांच्यासाठीही महत्वाचा मानला जात आहे.

Protected Content