रावेर(प्रतिनिधी) तालुक्यातील मंगळूर येथील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्यामुळे दारू माफिया खुले-आम देशी-विदेशी दारूची बेकायदा विक्री करतोय. दरम्यान, या संदर्भातील ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ वृत्त प्रकाशित करताच आपल्याकडील मद्याचा साठा मात्र, दारू माफियाने इतरत्र हलविल्याचे वृत्त आहे.
रावेर तालुक्यातील आदिवासी भागात मंगळुर गावात धरणाच्या अगदी जवळ एक इसम देशी-विदेशी कंपनीची अवैध दारू विक्री करत असल्याची बातमी नुकतेच झळकली होती. बातमी झळकताच गावक-यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स’चे न्यूजचे आभार व्यक्त करत सांगितले की, अवैध दारू विक्रेत्याने मंगळुर येथून आपला दारूचा स्टॉक इतर ठिकाणी हलविला आहे. पण विक्री मात्र, अजून थांबलेली नाही. कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी लक्ष घालून अचानक छापा टाकण्याची मागणी जनतेतून होत आहे.