यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील महाविद्यालयात प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षते खाली युवती सभेच्या उद्द्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी विद्यार्थिनींना अमूल्य असे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी सांगितले की, प्रशासकीय सेवेत महिला भविष्यात पुढे जाऊ शकतात. आज महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहे. तसेच स्त्रियांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महत्त्व पटवून देतांना त्यांनी सांगितले की,एक स्त्री शिकली तर ती दोन कुटुंबांचा व पर्यायाने समाजाचा उद्धार करते. तसेच स्त्रियांनी स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे. आपण जर ठरविले तर कोणतेही काम अवघड नाही असेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी विद्यार्थिनींना युवती सभेचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार व प्रा. संजय पाटील तसेच प्रा.मनोज पाटील, प्रा.सी.टी. वसावे, प्रा.प्रतिभा रावते,प्रा.धनश्री राणे, प्रा.सोनल बारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. निर्मला पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रजनी इंगळे यांनी तर आभार प्रा. डॉ. वैशाली कोष्टी यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.