मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टेलिग्राम ॲप वापरणाऱ्या युर्जसना मोठा फटका बसणार आहे. भारतात या ॲपवर बंदी घातली जाणार असल्याचे समोर येत आहे. टेलिग्राम ॲप हे भारतात सर्वात जास्त वापरले जाणारे आहेत. स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी या ॲपचा वापर करतात तर नवीन चित्रपट पाहण्यासाठी देखील हा ॲप महत्त्वाचा ठरतो. हा ॲपभारतात पूर्णपणे बंद करण्यात येईल अशी माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेलिग्राम ॲपवर खंडणी, पेपर लिक आणि सट्टेबाजीसारख्या बेकायदेशीर कामांसाठी टेलिग्रामचा वापर होत असल्याचा आरोप केला जात आहे. या करिता टेलिग्रामवर बंदी घालण्यात यावी अशी सायबर क्राईम यांची मागणी आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्याने हा तपास करत आहे.
गेल्या काही टेलीग्रामच्या माध्यमातून सायबर क्राइमच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अलीकडेच यूजीसी-नीट वादाच्या वेळी देखील टेलीग्राम चर्चेचा विषय ठरला आहे. मेडिकल प्रवेश परीक्षेचे पेपर लीक झाले होते आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर शेयर करण्यात आले होते.
टेलीग्रामचे फाउंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांना अटक पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतरच ही माहिती समोर आली. पावेल यांना २४ ऑगस्टला पॅरिस मध्ये त्यांच्या अॅपमधील मॉडरेशन पॉलिसीमुळे अटक करण्यात आली होती. प्लॅटफॉर्मचा गुन्हेगारीसाठी होत असलेला वापर रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे ही अटक केल्याचे सांगितले जात आहे.