….तर धनंजय मुंडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या ! : राणेंचा खोचक सल्ला

मुंबई । सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणार्‍या अनिल परब यांना टोला लगावत ”नको कशाला, तुम्ही विजयाची मिरवणुक काढा नंतर शिवाजी पार्क भरून विजय मेळावा घ्या त्याहून काही राहिलं असेल तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या”…असा खोचक सल्ला भाजप नेते निलेश राणे यांनी दिला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने शोषणाचे आरोप केल्यामुळे ते गोत्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांनी त्यांची पाठराखण केली आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील त्यांचे समर्थन करत, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले असले तर त्यांना फासावर लटकावणार का ? असा प्रश्‍न विचारला होता. याला निलेश राणे यांनी एका ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”नको कशाला, तुम्ही विजयाची मिरवणुक काढा नंतर शिवाजी पार्क भरून विजय मेळावा घ्या त्याहून काही राहिलं असेल तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या” असे यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राणे यांनी आधीच्या ट्विटमधूनही राष्ट्रवादीवर टीका केली होती. एखाद्या जेलमध्ये नसतील तेव्हढे गुन्हेगार राष्ट्रवादीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील यांनी घेतल्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते.

Protected Content