पंचक गावाजवळून तरूणाच्या दुचाकीची चोरी; अडावद पोलीसात गुन्हा

चोपडा प्रतिनिधी । जळगाव येथील तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील पंचक ते लोणी गावादरम्यान असलेल्या रोडवर घडली. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, गोकुळे आधार अडकमोल (वय-४१) रा. गेंदालाल मिल जळगाव हे चक्की दुरूस्तीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. अडावद येथे चक्की सुधरविण्याची ऑर्डर असल्यामुळे ते १३ एप्रिल रोजी दुरूस्ती करण्यासाठी (एमएच १९ यु ५७९८) क्रमांकाच्या दुकाने गेले. काम आटोपून ते सायंकाळी ५ वाजता जळगावात येण्यासाठी निघाले असता तालुक्यातील पंचक ते लोणी गावादरम्यान त्यांची दुचाकी बंद पडली. त्यांनी दुचाकी रोडवर असलेल्या रसवंतीच्या दुकानासमोर लावून ते जळगावला परत आले. १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. गोकुळे अडकमोल यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार चिंधु कोळंबे करीत आहे. 

Protected Content