शेतातील गोडावून मधून गव्हाचे पोते व शिलाई मशीनची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फेकरी शिवारातील दिपनगर जवळील शेतातील गोडावून फोडून गव्हाचे पोते आणि शिलाई मशीन असा एकुण १७ हजार ८५० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे ७ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल अशोक कवठे वय ४४ रा. फेकरी ता. भुसावळ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे दिपनगर जवळ शेतात गोडावून आहे. या गोडावूनमध्ये त्यांनी गव्हाचे पोते, शिलाई मशीन व इतर साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान ६ जून ते ७ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील गोडावून फोडून घरातून १७ हजार ८५० रूपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकरी अतुल अशोक कवठे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे हे करीत आहे.

Protected Content