जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे महालक्ष्मी मंदिर परिसरातील पाटचारीजवळून नगरपरिषदेचे पाणी पुरवठा करण्यासाठीचे ४ एअर व्हॉल चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी नशीराबाद पोलिसात चोरटयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशीराबाद नगर परिषदेचे पाणी पुरवठा करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसरात पाटचारीजवळ ठेवलेले ८ हजार रुपये किंमतीचे चार व्हॉल ठेवण्यात आले होते. हे चारही व्हॉल चोरटयांनी चोरुन नेल्याचे ७ सप्टेंबर रोजी समोर आले. सर्वत्र शोध घेवूनही व्हॉल मिळून न आल्याने नगरपरिषदचे पाणी पुरवठा विभागाचे लिपिक प्रविण ज्ञानदेव ढाके वय ३४ यांनी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे हे करीत आहेत.