चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील स्टेशनरोडवरील एका लॉजच्या समोरून वृध्दाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सर्जेराव भीमराव पाटील (वय-५९) रा. भडगाव जि.जळगाव हे कामाच्या निमित्ताने १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दुचाकी (क्रमांक एमएच १९ सीएस ५९७८) ने चाळीसगावातील रेल्वे स्टेशन जवळील सुभाष लॉज येथे आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी ६ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.