लोणी शिवारात विहिरीतून तीन पानबुड्यांची चोरी; गुन्हा दाखल

पहुर ता. जामनेर (प्रतिनिधी) । जामनेर तालुक्यातील लोणी शिवारात असलेल्या विहिरीतून तीन शेतकऱ्यांच्या १८ हजार रूपये किंमतीच्या इलक्ट्रिक पानबुडी आणि कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अनंत कशिनाथ वाणी (वय-४५) रा. लोणी ता. जामनेर यांचे लोणी शिवारातील गट क्रमां १५० मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीत असलेले पाणबुडीसह कॉपरची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २० ऑक्टोबररोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. दरम्यान, अधिक माहिती घेतली असता त्यांच्या परिसरातील शिवारातील सुपडाबाई रामा काटे यांची ५ हजाराची पानबुडे पंप, अशोक किसन वाणी यांची ५ हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार पंप असा एकुण १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अनंत वाणी यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण चौधरी करीत आहे.

 

Protected Content