एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील मेहरून येथील नियत क्षेत्र म्हणजेच लांडोरखोरी परिसरातून सौरऊर्जेच्या प्लेटांची चोरी करून १ लाख ५ हजात रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १४ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अधिक अशी की, जळगाव शहरातील मेहरून नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०६ म्हणजेच लांडोरखोरी परिसरात वनपरिमंडळ विभागाच्या वतीने सौर ऊर्जेच्या फेटा लावण्यात आलेले आहे. १३ जुलै रोजी रात्री ११ आणि १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तब्बल २१ प्लेटा असे एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन परिमंडळाचे अधिकारी संदीप नामदेव पाटील यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात सौरऊर्जेच्या प्लेटा चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साबळे करीत आहे.