शेतातील गोडाऊन मधून ट्रॅक्टरसह रोटाव्हेटरची चोरी

धरणगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील हिंगोणे शिवारातील शेत गट नंबर 8 मधील शेतातील गोडाऊन मधून ट्रॅक्टरसह रोटाव्हेटरची चोरी केल्याची घटना 18 जून रोजी सायंकाळी 5 वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी 21 जून रोजी दुपारी 3 वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण चुनीलाल बोरसे वय-38, रा. हिंगोणे ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे त्यांचे हिंगोली शिवारातील शेत गट क्रमांक ८ मध्ये शेत आहे. या शेतात गोडाऊन मध्ये त्यांचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 सी झेड 6148 आणि रोटाव्हेटरची पार्किंगला लावले होते. दरम्यान 18 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील ट्रॅक्टर आणि रोटाव्हेटर असा एकूण 4 लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार उघडकिला आला आहे. ट्रॅक्टर चोरीला गेल्यानंतर प्रवीण बोरसे यांनी शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 3 वाजता धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खुशाल पाटील हे करीत आहे.

Protected Content