गायत्री नगरात बंद घर फोडून सोन्याचे दागीने लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गायत्री नगरातील बंद घर फोडून घरातील १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने लंपास केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, मिलींद मोरेश्वर खानवाले (वय-६२) रा. गायत्री नगर जळगाव हे कुटुंबियांसह घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे १ मार्च ते ३ मार्च २०२१ रोजी गेले होते. ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कुलूप तोडलेले दिसून आले. घरात जावून पाहणी केली असता त्यांच्या घरात ठेवलेले १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे मंगळसुत्र चोरून नेल्याचे उघडकीला आले. मिलींद खानवाले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Protected Content