जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जैन व्हॅली एनर्जी पार्क येथून ३५ हजार रूपये किंमतीची पीव्ही सोलार केबलची चोरी केल्याची घटना सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव ते शिरसोली रोडवरील जैन व्हॅली येथील एनर्जी पार्क येथे ठेवण्यात आलेले जैन कंपनीचे मालकीच ३५ हजार रूपये किंमतीचे पीव्ही सोलार केबल ठेवण्यात आली होती. २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीतमध्ये अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीची पीव्ही सोलार केबल चोरून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर येथील कर्मचारी अविनाश देविदास बढे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करीत आहे.