भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गडकरी नगर भागातील आयुष्य आरोग्य केंद्रातून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह मोबाईल लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील गडकरी नगर भागात आयुष्यमान आरोग्य केंद्र आहे. या दवाखान्याच्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश करीत दवाखान्यातील नर्स कर्मचार्यांचे दोन लॅपटॉप व आरोग्य अधिकारी डॉ.तौफिक शेख यांचा मोबाईल असा एकूण दिड लाख रुपयांचे ऐवज लांबवला. सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता हा प्रकार समोर आला. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीनंतर चोरी केल्याचा दाट संशय आहे.
चोरट्यांनी दवाखान्यात प्रवेश करीत व्हॅक्सीनेशनचे काही कार्ड जाळले तर अन्य कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकली. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळताच त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक शेख यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे.