Home क्राईम कारची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

कारची चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

0
106

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कारची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अजिंठा चौफुली परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली कार पोलीसांनी जप्त केले आहे.

चंद्रकांत उर्फ गड्या गोरख चौधरी (वय २७) व त्याचा साथीदार विशाल लक्ष्मण माळी (वय २५, दोघ रा.अयोध्यानगर) असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ओमनी कार चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनिल नदंवाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना दिल्या होत्या. कार चोरी करणारे चोरटे हे अजिंठा चौफुली परिसरात कालीपीली चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने बुधवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली येथून चंद्रकांत उर्फ गड्या चौधरी व विशाल माळी यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरलेली कार काढून दिली. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी एरंडोल पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, गोरख बागुल, हेमंत पाटील, ईश्र्वर पाटील, महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound