बांधकामाच्या ठिकाणाहून साहित्यांची चोरी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको शिवारात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम व्यवसायिकाचे लोखंडी पत्रे व साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी ७ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रविण अशोक महाजन वय ३५ रा. गणेश कॉलनी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बांधकाम व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ६ ते ७ मे रोजीच्या कालावधीत त्यांचे पिंप्राळा येथील बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी पत्रे व इतर साहित्य चोरून नेले. हा प्रकार बुधवार ७ मे रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक मनोज सुरवाडे हे करीत आहे.

Protected Content