अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ठेकेदाराचे गोडावून फोडून अज्ञात चोरट्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमळनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शब्बीर हुसेन कुतुबुद्दिन (वय-५२) रा. सुरभी कॉलनी, अमळनेर यांचे बांधकामाचे ठेकेदार आहे. त्यांचे सध्या शहरातील पिंपळे रोडवरील शंकर नगरात त्यांचे बांधकामाचे साहित्य ठेवण्याचे गोडावून आहे. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे शब्बीर यांनी गोडावूनला कूलूप लावून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोडावून फोडून बांधकामाचे साहित्य चोरून नेले. यात तार, लोखंडी प्लेटा, सळईचे तुकडे, अँगलचे तुकडे असा एकुण ४४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार गुरूवार २८ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शब्बीर हुसेन कुतुबुद्दिन यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.