Home क्राईम लॅपटॉप अन् मोबाईलची चोरी; खेडी शिवरातील घटना

लॅपटॉप अन् मोबाईलची चोरी; खेडी शिवरातील घटना

0
123


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडी शिवार परिसरात एका धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रूममध्ये तरूण झोपलेला असताना अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. खेडी शिवार, भुसावळ रोड, जळगाव) हा तरुण महेंद्र ढाब्याच्या मागे असलेल्या पागारिया गॅरेजसमोरील रूममध्ये राहतो. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास योगेश आणि त्याचा मित्र वैभव महाजन हे दोघे रूममध्ये झोपलेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रूममध्ये प्रवेश केला.

चोरट्याने योगेशच्या उशाशी ठेवलेला २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जेव्हा योगेशला जाग आली, तेव्हा त्याला आपले साहित्य गायब असल्याचे दिसून आले. या चोरीप्रकरणी योगेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रमेश चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound