धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या महिलेचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील साहिल नगरात सरलाबाई सुरेश सोनवणे वय-५७, या महिला वास्तव्याला आहे. शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्याच परिसरात सरलाबाई सोनवणे यांची बहीण प्रमिलाबाई भालेराव या वास्तव्याला आहे. दरम्यान प्रमिलाबाई भालेराव यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरातून १४ हजार रुपये किमतीच्या चांदीचे दागिने चोरून नेले.ही घटना उघडकीला आल्यानंतर सरलाबाई सोनवणे यांनी पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.ना. उमेश पाटील करीत आहे.