भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील दिपनगर येथील विद्युत केंद्रातून लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात आल्या चोरट्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या मालकीचे १२ हजार रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता समोर आले. या प्रकरणी कनिष्ठ सुरक्षा अधिकारी स्वप्निल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे हे करीत आहे.