Home क्राईम जळगावात लोखंडी गेटची चोरी; शहर पोलीस ठाण्यात तक्रार

जळगावात लोखंडी गेटची चोरी; शहर पोलीस ठाण्यात तक्रार

0
114
FIR

जळगाव प्रतिनिधी । शहरातील व.वा. वाचनालयाच्या टिळक सभागृहाचे चायनल गेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

गुरूदत्त विनायक व्यवहारे (वय-५२) रा. नवी पेठ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील व.वा. वाचनालयाच्या टिळक सभागृहाला लोखंडी चायनल गेट आहे. हे गेट आज सकाळी अज्ञात चोरट्यांनी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८६३४) मध्ये लोखंडी गेट ठेवून चोरी करून गेंदालाल मिल परिसरातकडे घेवून गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.


Protected Content

Play sound