जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कानळदा रोडवरील लक्ष्मी नगरात दोन जणांच्या ३२ हजार रूपये किंमतीच्या बकऱ्यांची चोरी केल्याची घटना शनिवारी ५ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज खान अमीर खान पठाण वय ४५ रा. लक्ष्मी नगर, कानळदा रोड, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रेशनिंग दुकानासह बकऱ्यांचे पालन करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराजवळ त्यांनी दोन बकऱ्या बांधलेल्या होत्या. तसेच त्याच परिसरात राहणारे नाथा अश्रुबा तांबे यांच्या देखील बकऱ्या बाहेर ओट्यावर बांधलेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी फिरोज खान आणि नाथा तांबे यांच्या चार बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी ५ मे रोजी पहाटे ३ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रात्री ९ वाजता फिरोज खान यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.