चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तळोदा शिवारातील सेट गट क्रमांक ४८० मधून शेतकऱ्यांच्या एकूण ४ इलेक्ट्रिक मोटारींची चोरी झाल्याची घटना घडली. इलेक्ट्रिक मोटार यांची चोरी करणाऱ्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम राजेंद्र महाजन (वय-२१ रा. कजगाव ता.चाळीसगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तळोदा येथे मोतीराम आप्पा चव्हाण वय-४७ हे वास्तव्याला आहे. त्यांचे तळोदा शिवारातील शेत गट क्रमांक ४८० मध्ये शेत आहे. शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांच्यासह इतर तीन शेतकऱ्यांच्या एकूण ४ इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेण्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात शेतकरी मोतीराम चव्हाण यांनी रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम राजेंद्र महाजन यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश मांडोळे हे करीत आहे.