चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील बाणगाव धरणातून 20 हजार रुपये किमतीची जलपरी मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून निल्याची घटना गुरुवार 23 मे रोजी सकाळी 9 वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी दुपारी 1 वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील सांगवी गावातील ग्रामपंचायतीचे मालकीचे इलेक्ट्रिक जलपरी ही बाणगाव धरणातून आज्ञा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 22 मे रोजी दुपारी 4 ते 23 मे रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतचे कर्मचारी परशुराम बाबुराव गायकवाड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुरुवार 23 मे रोजी दुपारी 1 वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पाटील हे करीत आहे.