शेतातील घरातून कापूस व कोंबड्यांची चोरी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सावतर शिवारातील शेतातून ६ क्विंटल कापूस आणि ३० कोंबड्या असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या प्रकरण वरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ३.३० वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उदय नारायणराव देशमुख (वय-६४) रा. वरणगाव ता.भुसावळ हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शेतीसोबत ते कोंबड्या पालन व्यवसाय करतात. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सावतर शिवारातील शेतातून ६ क्विंटल कापूस आणि ३० कोंबड्या असा एकूण ३० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वृद्ध शेतकरी उदय देशमुख यांनी दुपारी ३.३० वाजता वरणगाव पोलिसात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील करीत आहे.

Protected Content