जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रजापत नगर भागातील पवन नगरात राहणाऱ्या तृतीयपंथीचे बंद घर फोडून घरातून रोख रकमेसह दोन तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या असा एकूण अंदाजे ३ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे घटना सोमवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. चोरीप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती तक्रारदार तृतीय पंथी पुनम जान यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रजापत नगर भागातील पवन नगर ते राहणाऱ्या तृतीयपंथी पुनम जान या आपल्या आई सह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवारी १ एप्रिल रोजी त्या कामाच्या निमित्ताने अमळनेर येथे गेल्या होत्या. तर त्यांची आई देखील घरी नव्हत्या. त्यामुळे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत बंद घराच्या बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला.
घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त करून घरातून २ तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठ्या आणि आणि जवळपास १ लाख ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण अंदाजे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तृतीयपंथी पुनमजान सायंकाळी ७ वाजता घरी आल्या तेव्हा घरात चोरी झाल्याचे समोर आले. या संदर्भात त्यांनी जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली, पोलिसांनी घटनांसाठी धाव घेऊन पंचनामा केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.