Home क्राईम लॉजमधून मोबाईलसह रोकडची चोरी; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल

लॉजमधून मोबाईलसह रोकडची चोरी; बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गोल्डन पॅलेस लॉजमधून खाजगी नोकरी करणाऱ्या एकाचा मोबाईल आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या संदर्भात गुरूवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विजय सुरेश गोरे (वय-५८) रा. समृद्ध पार्क, सुरभी नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. भुसावळ शहरातील हनुमान मंदिर परिसराजवळील गोल्डन पॅलेस लॉज येथे १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता कामावर हजर होते. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर विजय गोरे यांनी मोबाईल व रोकडची चौकशी केली, परंतु या संदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात  भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नेव्हील बाटले करीत आहे.


Protected Content

Play sound